बीड — अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करुन बेशुद्ध अवस्थेत चावडीच्या खांबाला बांधल्याच प्रकरण घडलं होतं. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली असून पीडित महिला अल्पवयीन असून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील हिवरा पहाडी येथे अल्पवयीन विवाहित महिलेला रात्री उचलून घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.पिडीता बेशुद्ध पडली असताना तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवले
झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला
. ही बात सकाळी गावकऱ्यांच्या नजरेस पडली. त्यानंतर खांबाला बांधलेल्या पीडीतेची सुटका करण्यात आली. सुटका करण्यापूर्वी तिचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता. ही घटना राज्यभर गाजली असून महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तपास अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधला. आता, पीडित अल्पवयीन महिलेच्या विवाहावरुनही गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपास अधिकारी अतुल कुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून दिल्या आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासा दरम्यान पीडित मुलीचा गेल्याच वर्षी बालविवाह लावून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.




