Sunday, February 1, 2026

नाकाने वांगे सोलणारी व्यवस्था शेळपटली,”फाटे” पूढे गोंडा घोळत बसली जीएसटी अधिकारी जाधवर मृत्यू प्रकरणात कावतांची हतबलता बीड ने पाहिली

बीड — कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष, राजकीय दबावाला बळी न पडता काम करणारे म्हणून प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक नवनीत कांवत जीएसटी अधिकाऱ्याच्या आत्महत्ये प्रकरणात हतबल असल्याचं त्यांच्या कार्यपद्धतीला फाटेने फाट्यावर मारल्याचं बीडच्या जनतेने पाहिलं. जेवढी बीडमध्ये इज्जत कमावली ती मूदीराज च्या नादी लागून आमदाराच्या दबावा खाली येऊन मातीत घातली. जाधवर आत्महत्याप्रकरणी सात दिवसानंतरही कुटुंब एसपींची भेट घेतं. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर धरण देतं. तरीही गुन्हा दाखल करायला वेळ घेतला जातो.एवढा शेळपटलेला कारभार सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
आपल्याच महतीचा डंका वाजवायचा कायदा सुव्यवस्था निर्माण केली म्हणून सांगायचं पण वास्तव पाहतांना मात्र धृतराष्ट्रासारखी आंधळी भूमिका घ्यायची हीच पोलीस अधीक्षकांची कर्तव्यदक्षता असल्याचे चित्र जिल्ह्यात तरी पाहायला मिळत आहे.
सचिन जाधवर या जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पदरीत्या आठ दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कपिलधार वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ कार मध्ये आढळला. शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट आढळली. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं तसेच प्रदीप फाटे या अधिकाऱ्याचं नाव
त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलं होतं. घटना घडल्याच्या दिवशीच त्यांची पत्नी मयुरी सचिन जाधवर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात आल्या. त्यावेळी ठाणे प्रमुख मूदीराज यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. वाटलं नंतर तरी गुन्हा दाखल होईल.मयुरी जाधवर दुःखात आहेत म्हणून कदाचित मूदीराज मधली माणुसकी जागी असेल म्हणून झाला नसेल असं वाटलं. त्यानंतरही मयुरी जाधवर व त्यांचे नातेवाईक वारंवार गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत बसले.पण ठाणे प्रमुख मूदीराज यांना पाझर फुटलाच नाही. माणुसकीचं दर्शन झालच नाही. सुसाईड नोट मध्ये ज्या “प्रदीप फाटे” नावाच्या अधिकाऱ्याचं नाव आढळून आलं त्या फाटेला बोलावून घेत विचारपूस करण्याचा फार्स केला गेला. तपास होत नाही तोपर्यंत बीड सोडायचं नाही असं त्याला सांगितलं असल्याचं पोलीस सांगू लागले. या सुसाईड नोट मध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांनी काय लिहिलं आहे कोणाकोणाची नाव आहेत याची माहिती कुटुंबीयांना देणं गरजेचं होतं. पण ती देखील मोदीराज ने दिली नाही.कायद्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं म्हणत आरोपी पुढे गोंडा घोळण्याचे काम केलं गेलं. न्यायासाठी मयुरी जाधवर यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची आठ दिवसानंतर आज भेट घेतली. काळीज पिळवटून टाकेल अशी दर्द भरी कहानी एसपींना सांगितली. हीच कहाणी मयुरी जाधववर यांनी माध्यमांसमोरही सांगितली गेल्या एक महिन्यापासून ते प्रचंड मानसिक तणावात होते, मला ऑफीसचं टेन्शन आहे असे ते सांगायचे. एवढेच नव्हे तर या घटनेच्या ८-१० दिवसा पुर्वी माझ्या मुलाचे शाळेतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही जाधवर यांच्या पत्नीने माध्यमांना सांगितले. ऑफीसच्या बाहेर सुध्दा एका इनोव्हा गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ झाली होती, एवढेच नव्हे तर थांब तुला बघतो अशी धमकी दिल्याचा दावा देखील जाधवर यांच्या पत्नीने केला. अशा घटनांमधुन त्यांना जाणिवपुर्वक मानसिक त्रास दिला गेला. यामागे नेमकं काय होतं ? याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयात नेमकं काय सुरू होतं ? याचाही तपास होणे गरजेचे असल्याच्या त्या म्हणाल्या. प्रदिप फाटे व कार्यालयातील त्याच्यासोबत आणखी दोन-तीन लोकं आहेत. त्यांची सुध्दा सखोल चौकशी झाली पाहिजे. सुसाईड नोटमध्येही प्रदिप फाटे याच्यासह त्याच्यासोबतचे कर्मचारी असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाच्या अपहरणासारखे धक्कादायक खुलासे मयुरी जाधवर यांनी नवनीत कावत यांच्यासह माध्यमांसमोर केले असले तरी फारसा फरक पडला नाही. या संदर्भात सुसाईड नोट सोबतच पोस्टमार्टम रिपोर्ट मिळावा अशी मागणी देखील मयुरी यांनी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा यासाठी नातेवाईकांनी पुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्याकडे येऊन विनंती अर्जव केले.पण मूदीराज खुर्चीवर स्थितप्रज्ञपणाने नातेवाईकांकडे पहात बसले.पाषाणाला ही पाझर फुटला असता पण ठाणे प्रमुखाला पाझर फुटलाच नाही. या प्रकरणात नुसता गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगून वाटी लावण्याचा वारंवार प्रयत्न त्यांनी केला. नातेवाईकांनी दुपारपासून ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. रात्री साडेआठ पर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता नातेवाईक मात्र ठाण मांडून तिथेच होते.
याची भनक एसपींना लागली नाही का? एसपींनी पोलीस ठाणे आधुनिक करायचे म्हणून गाजावाजा केला.पण पीडित कुटुंब ठिय्या मांडून बसलय ही बाब एसपीना कशी कळाली नाही.
एस पी साहेब….!
प्रामाणिक कर्तव्यदक्ष जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांची ही वाताहात तुम्ही व तुमचे पोलीस ठाणे करीत असतील तर सर्वसामान्य गोरगरिबांचं काय? पोलीस अधीक्षक धुतल्या तांदळासारखे पण भातात लागणाऱ्या खड्यासारखे
असून जनतेला उपयोग काय? तुमच्या आधुनिकीकरणाचा जनतेला उपयोग काय? मूदीराज सारखा अधिकारी तुमचा ऐकत नाही काय? राजकीय दबावाला बळी पडणारे तुम्हीही निघालात काय? माध्यमावर जाधवर आत्महत्या प्रकरणात छापून आलेल्या घटना वर तुमचं लक्ष नाही काय? एवढ्या मोठ्या घटनेवर तुमचं लक्ष नाही तर गोरगरिबांचा काय? अवैध धंदे नाकावर टिच्चून चालू आहेत त्याचं काय? जाधवर कुटुंबीयांना न्याय मिळणार का? कायदा असाच फाट्यावर मारला जाणार का? यासारखे अनेक प्रश्न जाधवर कुटुंबासह सर्वसामान्य जनतेकडून विचारले जाऊ लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles