बीड — शहरातील जटाशंकर गल्ली मध्ये राहणारे प्रभाकरराव (पोपट काका) जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते.
अतिशय बोलका व प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ते सर्वपरिचित होते. एबीपी माझाचे कॅमेरामन तथा चॅनल प्रतिनिधी प्रमोद (पिंटू) जोशी व प्रवीण अण्णा जोशी यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजता अमरधाम स्मशानभूमी मोंढा रोड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा” सहभागी आहे.

