आर्थिक स्थितीमुळे करुणा मुंडेंना 2 लाखाची पोटगी; कौटुंबिक हिंसाचार झाला नाही — धनंजय मुंडे च्या वकिलाचे स्पष्टीकरण

मुंबई — मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून २ लाख रुपये  पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे.धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. असे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिल्या बाबत त्यांनी यापूर्वीच कबुली दिलेली असून, आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचे वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

ऍड.सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुध्दा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार व अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकन पासून दूर रहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम कर्मी याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन ऍड.सायली सावंत यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles