Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

गेवराई पोलीस लाच प्रकरणात बीडमध्ये…
बीड — पकडलेली रिक्षा सोडून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवरच लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन संताराम शिंदे (वय ४८, रा. शाहूनगर, बीड) आणि पोलीस हवालदार रामराव केशव आघाव (वय ४६, रा. शिक्षक कॉलनी, बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही गेवराई पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारवाईदरम्यान तक्रारदाराची रिक्षा पोलिसांनी पकडली होती. ही रिक्षा सोडून देण्यासाठी संबंधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. लाच देण्याऐवजी तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली. त्यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर दोघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा – ACB महाराष्ट्र
हे पण वाचा: बीड जिल्ह्यातील ताज्या बातम्या येथे वाचा
गेवराई तालुक्यातील इतर बातम्या: गेवराई न्यूज – सर्व अपडेट्स
क्राईम न्यूज: महाराष्ट्रातील गुन्हेगारी बातम्या वाचा
हे देखील वाचा: सह्याद्री माझा – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
🏛️ ACB महाराष्ट्र – अधिकृत वेबसाईट
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र शासन