बीड — सतीश चव्हाण यांचा तब्बल 18 वर्षाचा आमदारकीचा कार्यकाळ हा पदवीधरांच्या जीवावर निवडून यायचं अन् आपलं साम्राज्य विस्तारायचं एवढाच एक कलमी कार्यक्रम राबवण्यात धन्यता मानली. मराठवाड्यात मात्र यावेळी फुटीरतेच्या घुशीने बुरुजं खिळखिळी केली आहेत.तर त्यांच्यातल्या मग्रूरीचा सरदा त्याने बुरुजाच्या भिंतीला लागलेला लोना समाज माध्यमावरचा पदवीधरांचा आमच्यासाठी काय दिवे लावले यासारख्या प्रश्नांच्या भडीमाराचा टोमणा अशा स्थितीत हा बालेकिल्ला रोज ढासळत असून भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे.निवडणुकीत त्यांची टाय टाय फिस होण्याची शक्यता प्रबळ झाल्याचं चित्र निर्माण झाला आहे.
सतीश चव्हाण हे 2008 पासून आजतागायत मराठवाड्या पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत आहेत. प्रत्येक वेळी मराठवाड्याने त्यांना भरभरून साथ दिली.प्रत्येक वेळी निवडून येताच पदवीधरांना मग्रुरी ची मस्ती दाखवली. विधान परिषदेची आमदारकी त्यांनी स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी वापरली यामध्ये पदवीधर व त्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडून दिले. विधान परिषदेत पदवीधरांच्या प्रश्नावर आवाज उठवताना कधी दिसलेच नाहीत. यामुळेच पदवीधरांचे प्रश्न आजही जैसे थेच आहेत. बेरोजगारी वाढली आहे. पदवीधर नोकरीच्या शोधात भटकतो आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले म्हणून आक्रोश करत आंदोलन करत आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व करणारे हे आमदार आपल्याच मस्तीत आहेत. पेपर फुटी प्रकरणात त्यांनी अवाक्षरही काढलं नाही. फक्त मतदाना पुरताच त्यांना पदवीधर आठवत असल्याने पदवीधरांमध्ये सतीश चव्हाण विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. याला समाज माध्यम देखील खतपाणी घालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
भ्रष्ट संस्थाचालक व पिळवणूक नोकरीवर टांगती तलवार मुळावर उठणार
शैक्षणिक संस्था चालवणारे संस्थानिक हाताशी धरायचे हा नेहमीचा फंडा यावेळी उलटा पडत असतानाच चित्र बघायला मिळत आहे. अनेक संस्थांमधून बोगस शिक्षक भरती, वेतन घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा यासारखे मुद्दे सध्या गाजत आहेत. संस्थाचालकांनी केलेले भ्रष्टाचार शिक्षक प्राध्यापकांच्या अंगलट येत आहेत. संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक त्यातून नोकरीची निर्माण झालेली अनिश्चितता. कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत भ्रष्टाचारी शिक्षण संस्था चालकांना हाताशी धरणाऱ्या सतीश चव्हाण विरोधात उघड जरी बोलले नाहीत तरी याचा फटका बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवारांची साथ सोडली
सतीश चव्हाण यांनी राजकारणातले भीष्म पितामह असलेल्या शरद पवार यांची साथ सोडली. फक्त सत्तेची फळ चाखायला मिळून आपला साम्राज्य विस्तार आणखी व्हावा यासाठीच परिणामी शरद पवार यांच्या जीवावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव झाले असले सगळं अलबेला असलं तरी शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या शैक्षणिक संस्थेत आहे. या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली नाराजी सतीश चव्हाण यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे.
फुटीरतेच्या घुशीने बालेकिल्ला पोखरला
सतीश चव्हाण यांच्यातली मग्रुरी फुटीरतेला बळ देणारी ठरली. महायुतीतच धोक्याचा सायरन सुरुवातीलाच वाजला आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी तर “सतीश चव्हाण यांची आमदार होण्याची लायकीच नाही”अशा शब्दात उघड उघड टीका केली. यातूनच सतीश चव्हाण विरोधकांना प्रचारासाठी आयता मुद्दा हाती आला. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील सतीश चव्हाण विरोधात दंड थोपटले आहेत. सिल्लोड सोयगाव व छत्रपती संभाजी नगर मध्ये अब्दुल सत्तार यांचे असलेले वर्चस्व पाहता. पदवीधरांचा मतांचा फटका सतीश चव्हाण यांना मोठा बसणार आहे.
हे कमी की काय म्हणून कन्नड च्या आमदार संजना जाधव या देखील सतीश चव्हाण विरोधात मैदानात उतरल्या आहेत. कन्नड मध्ये त्यांना मानणाऱ्या पदवीधरांचा मोठा परिणाम सतीश चव्हाण ची गढी ढासळून टाकण्यास कारणीभूत ठरणार आहे. या तीनही आमदारांचा होत असलेला विरोध पराभवाला कारणीभूत ठरणार आहे.
भाजपा आमदार प्रशांत बंब व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या भूमिकेमुळे भाशिप्रकडे मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव हजारो शिक्षकांचे आणि पदवीधरांचे हक्काचे जाळे आहे, जे मतदानाच्या दिवशी चव्हाणांच्या विरोधात मतदान करण्यासाठी ओळखले जाते. आरएसएस चा पगडा असल्यामुळे पूर्वीपासूनच या संस्थेशी निगडित असणारा वर्ग विरोधात आहे.
शरद पवारांचा पगडा अन् सतीश चव्हाण चा कारभार उघडा
सतीश चव्हाण हे मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थावर शरद पवारांच्या समर्थकांच्या असलेल्या पगड्याच्या जीवावर आजपर्यंत निवडून आले. या निवडणुकीत त्यांनी अठरा वर्षात केलेल्या कामाचं वस्त्रहरण होत असून उघडं होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शरद पवारांना मानणाऱ्या राजेश टोपे यांच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच मोठं जाळ जालना भागात पसरलेलं आहे. लातूर मधील अमित देशमुख व बाभळगावकर घराणे यांच्या ताब्यातील काँग्रेस विचारधारेच्या संस्था व शरद पवारांचे घनिष्ठ संबंध सर्वांना माहीतच आहेत. हिंगोलीत जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नियंत्रणातील संस्था मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. याबरोबरच विद्यापीठ नामांतरातून शरद पवारांची जोडला गेलेला दलित पदवीधर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या संस्थांमधून बसणारा फटका सतीश चव्हाण यांची दांडी गुल करणारा आहे.
सतीश चव्हाण जिकडे जातील तिकडे बदलाचे वारे पाहायला मिळत आहे. पदवीधरांच्या रोषाला सामोरे जात असताना प्रचार सभांना देखील गर्दी होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या सभेला भाजपच्या संस्था ताब्यात असलेल्या अनेक नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.