Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124


पीडित मुलीने महिला अधिकाऱ्यासमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, एका महिलेने तिचे अपहरण करून मुंबईत 5 लाख रुपयांना विकण्याचा व्यवहार ठरवला होता. तो रद्द झाल्यावर छत्रपती संभाजीनगर येथील महिलेने तिला गोविंदवाडी येथील युवकाला 1 लाख रुपयांत विकले. तसेच पैठण येथील मठात तिचा बालविवाह लावून दिल्याचे समोर आले आहे.
Beed AHTU Action: या प्रकरणात 2 महिला आणि 2 पुरुष अशा 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे पथक: पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहायक उपनिरीक्षक उषा चौरे, पो.ह. प्रदीप येवले, अशोक शिंदे, पो.शि. भाऊसाहेब कारले, संदीप गर्जे सर्व नेमणूक AHTU बीड.
बीड जिल्ह्यात AHTU पथकाने यापूर्वीही अनेक मानवी तस्करीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील अवैध मानवी वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
Tags: Beed Crime, AHTU Beed, Human Trafficking