Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

गेवराई — समाजातील वंचित, गरजू आणि दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरचे हास्य काम करण्याचे बळ देते असे सांगत शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीय प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देत गेवराई विधानसभा मतदार संघातील एकही दिव्यांग व्यक्ति लाभापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. ते गेवराई तहसिल कार्यालय येथे दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप प्रसंगी बोलत होते.
गेवराई तालुक्यातील २०२ दिव्यांग लाभार्थ्यांना शुक्रवार, दि.२० रोजी आ. विजयसिंह पंडित यांच्याहस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, गटनेते शेख खाजाभाई, नायब तहसिलदार सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी आपल्या आयुष्यातील अडचणी, संघर्ष आणि स्वाभिमानाने उभे राहण्याची जिद्द खरोखर प्रेरणादायी आहे. समाजात प्रत्येकाला समान संधी आणि सन्मान मिळावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे अधिकतेने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाच्या विविध योजना खऱ्या अर्थाने दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील एकही दिव्यांग व्यक्ति शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी तळेवाडी येथील दिव्यांग राहुल थोटे, योगेश पवार, वैशाली चिकणे, अशोक यमगर, गीता येवले, विश्वांभर यमगर, गणेश येवले, कटचिंचोली येथील काका कोकणे, किरण कोकणे, दुर्गा काळे, लिंबाजी शिंदे, आगरनांदुर येथील शिवराज काळे, संतोष काळे, आप्पासाहेब काळे, लुखामसला येथील मिरा बरगे, ज्ञानोबा नलभे, अंजनाबाई नलभे आदींना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. गेवराई तहसिल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमास नगरसेवक श्री. शहारुख पठाण, माजी नगरसेवक श्री. गोरख शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. शितल धोंडरे, तौर, पठाण, श्री. संदिप मडके, श्री. गोकुळ चोरमले, श्री. गणेश सावंत, श्री. वसीम फारोकी, श्री. दिनकर काळे, श्री. हनुमान कोकणे, श्री. बाबासाहेब जाधव, श्री. महेश ढेरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.