Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर दिंद्रुड पोलिसांनी कारवाई करत तब्बल 12 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर रोजी हॉटेल बप्पाश्री जवळ, आनंदगाव ते लोनगाव रोड वर पांढऱ्या रंगाचे क्रमांक नसलेले पिकअप वाहनात जितीन राजेभाऊ पौळ, वय 32 वर्षे, रा. खरात आडगाव हा एक ब्रास वाळू 6000 रुपये किमतीची ची अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील पिकअप व एक ब्रास वाळू असा एकूण चार लाख सहा हजार रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत लोनगाव चौकाजवळ, आनंदगाव ते लोनगाव रोड वर आरोपी जीवन काशिनाथ साळवे, वय 30 वर्षे, रा. खरात आडगाव, ता. माजलगाव हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक 407 टेम्पो क्र. एम एच 21 एक्स 0353 मध्ये अवैधरीत्या नऊ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू वाहतूक करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील आठ लाख रुपयाचा टेम्पो वाहन दिड ब्रास वाळू 8 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात कलम: 303(2) बीएन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात सपोनि. महादेव ढाकणे, पोउपनि. पवनसिंग जंघाळे,भराडे,सचिन गायकवाड यांनी केली आहे.