Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने पोलीस दलात पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. गृह विभागाने मंगळवारी (दि.२३) राज्यातील १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ५२ आयपीएस अधिकारी आणि ४४ राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या बदल्यांमध्ये सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वेग वाढला असून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने फेरबदल सुरू आहेत. नव्या आदेशांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खांदेपालट पाहायला मिळत आहे.
प्रशांत मोहिते — पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर → पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई
निलभ रोहन — पोलीस अधीक्षक, हिंगोली → पोलीस अधीक्षक, नांदेड
अभिनाश कुमार — पोलीस अधीक्षक, नांदेड → पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
श्रेणिक लोढा — अपर पोलीस अधीक्षक, खामगाव → पोलीस अधीक्षक, हिंगोली
रुपाली अंबुरे — पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई → पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
शशिकांत सातव — पोलीस उप आयुक्त, नागपूर → पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
रमेश धुमाळ — पोलीस उप आयुक्त, अमरावती → पोलीस उप आयुक्त, नागपूर
पीयुष जगताप — समादेशक, एसआरपीएफ गट क्र.१७ चंद्रपूर → अपर पोलीस अधीक्षक, खामगाव
नारायण शिरगांवकर — समादेशक, एसआरपीएफ गट क्र.१३ गडचिरोली → समादेशक, एसआरपीएफ गट क्र.१९ कुसळगाव, अहिल्यानगर
प्रांजली सोनावणे — पोलीस अधीक्षक, गुप्तवार्ता विभाग, अमरावती → पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर