पीआय गोसावी दरोडेखोरावर सवाई; थरारक कारवाईत दरोडेखोर पकडले

Spread the love

नेकनूर — सोलापूर मधील मोहोळ तालुक्यात दरोडे वाट मारी लूटमार करणारे दरोडेखोर बीड जिल्ह्यात असल्याची माहिती सोलापूरच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. दरोडेखोरांच्या मागावर असलेल्या सोलापूर पोलिसांचे पथक केज मध्ये आले. दरम्यान दरोडेखोर नेकनूरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला. एपीआय चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ नेकनूर चौकात नाकाबंदी केली. पळून जात असलेल्या दोन दरोडेखोरांना थरारक पद्धतीने जेरबंद करण्यात यश मिळवले.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दरोडे टाकणारे दरोडेखोर बीडच्या दिशेने एमएच २२ ए ३४ ४६ या गाडीने सोलापूर पोलिसांना हुलकावणी देत निघाले होते. दरोडेखोरांच्या पाठलागावर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होतेच. केज मधून हुलकावणी देऊन नेकनूर कडे दरोडेखोर निघालेले असताना सोलापूर पोलिसांनी नेकनूर पोलिसांचे संपर्क साधला. ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ नेकनूरच्या नुराणी चौकात नाकाबंदी केली. दरोडेखोरांना पळून जाताना अडथळा निर्माण व्हावा अशा पद्धतीने तीनही रस्त्यांना वाहने आडवी लावली. दरोडेखोर भरधाव वेगात आल्यानंतर अडथळ्यातून मार्ग काढत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या. दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस नाईक सचिन वंजारे पोलीस अंमलदार बाळासाहेब ढाकणे सय्यद अब्दुल्ला सहाय्यक उपनिरीक्षक रेखा मॅडम पोका आशा चौरे होमगार्ड मुतजीब आतार यांनी पार पाडली. पकडलेल्या दरोडेखोरांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *