गुत्तेदार करतोय पुलाचे काम लावून थुंका; शाखा अभियंता ठाकूरच्या मदतीने जनतेला फासतोय बूक्का

Spread the love

चौसाळा — चौसाळा नांदूर रोडवर ज्योतिबा नाल्यावरील पुलाच्या डागडुजीचे काम थातुरमातुर करत शासनाच्या तिजोरीला लुटल्याचा चंग गुत्तेदाराने बांधला आहे. पूल खचलेला असला तरी वरच्यावरीच कठडे बांधून रंगरूप आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चौसाळा नांदूर रस्त्यावरील पुलांची डागडुजी करण्यात येत आहे. कोष्टी नाल्यावरील पुलाच्या सिमेंट नळ्या सध्याच्या स्थितीत वाहून गेलेल्या आहेत. हा पूल खचून भगदाड पडली आहेत. या भगदाडामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले असले तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयर सुतक नाही. तीच स्थिती जोतिबा नाल्यावरील पुलाची आहे. पूल खचून कठडे कोसळलेले आहेत. दरम्यान या पुलाच्या डागडुजी चे काम सध्या हाती घेतलेले आहे. मात्र हे काम ज्या गुत्तेदाराला दिले आहे. तो गुत्तेदार नुसता थूंक्याला थूंका लावण्याचे काम करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. जुने कठडे अर्धा फूट उकरून त्यावरच सेंट्रींग ठोकून थातूरमातूर काम सुरू केलं आहे. ज्या पूलाचा पायाच खचला आहे. त्याला वरच्या बाजूला डागडुजी करून उपयोग काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला बुद्धिवंत अभियंते मिळालेले असल्यामुळे जनतेला मुर्खात काढून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा आहे की काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे पुलाचे कठडे अर्धा फूट उकरल्यानंतर त्याखाली काळी मातीच असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या पुलाचे काम अशा पद्धतीने थातूरमातूरच करायचय तर काळे कागद करून बिल उचलली तरी काय हरकत आहे.असं काम करण्यापेक्षा न केलेलं बरं असं आता जनतेत बोललं जाऊ लागला आहे.
यासंदर्भात शाखा अभियंता संजय ठाकूर यांना संपर्क साधून प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकुरी थाटात असलेल्या या अभियंत्याला फोन उचलण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. कार्यकारी अभियंता तोंडे असे गुत्तेदार हाताशी धरून लोकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बोराडेंचा राडा जनतेच्या मुळावर उठणार आहे.
या पुलाचे काम दर्जेदार करण्यात यावं अशी मागणी होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *