Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

केज — एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत एक लाख 72 हजार रुपयाची साडेचार किलो अफू जप्त करण्यात आली. ही घटना कळंबआंबा येथे उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की कळंब अंबा येथील शेतकरी उत्तम रंगनाथ मस्के या शेतकऱ्याने शेतात कांद्याची लागवड केलेली आहे. याच कांदा पिकात अफू पिकाची देखील लागवड केली. या संदर्भात युसुफ वडगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली या माहिती आधारे पोलिसांनी सोमवारी उत्तम मस्के यांच्या शेतात धाड टाकली. असता अफूची झाड मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी साडेचार किलो अफु जप्त केला. या अफुची किंमत 1 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी उत्तम मस्के यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नायब तहसीलदार आशा वाघ, पोलीस निरीक्षक शेंडगे, सय्यद अमजद, शिनगारे, घोरपडे, महादेव, राऊत, डोंगरे, चालक गायकवाड यांनी केली आहे.