पर्यावरण संवर्धन हीच पंकजाताईंना खरी वाढदिवसाची भेट — डॉ.योगेश क्षीरसागर

चौसाळा, शिवणी येथे वृक्षारोपण; पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

बीड  — ना.पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या पर्यावरण या महत्वपूर्ण खात्याच्या मंत्री आहेत. त्यांच्या आवाहनाला अनुसरून पर्यावरण संवर्धन करणे हीच पंकजाताई मुंडे यांना खरी वाढदिवसाची खरी भेट आहे. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडविण्याचा संकल्प आहे. प्रत्येक नागरिकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे सोमवारी (दि.२७) वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.क्षीरसागर हे बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस देविदास नागरगोजे, जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड, शहर मंडळ प्रमुख अशोक लोढा, ग्रामीण मंडळ प्रमुख मनोज पाटील, अशोक रसाळ, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौसाळा येथील नवगण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान महाविद्यालयाच्या सुमारे ०.५० हेक्टर परिसरात डॉ.क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून १५ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट जंगल प्रकल्प साकारण्यात आला आहे. यावेळी माजी सभापती काकासाहेब जोगदंड, गणेश काकडे, इम्रान जागीरदार, लहू नाईकवाडे, प्राचार्य पंडित खाकरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर चौसाळा येथील कै.चांदमल लोढा विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमातही डॉ.क्षीरसागर सहभागी झाले. यावेळी तानाजी थोरात, भीमराव विधाते, चंद्रकांत मुळे, राहुल जोगदंड, गणेश काकडे, विनोद कळासे, अंकुश कळासे, भागवतराव आंधळे, अंकुश गोरे, आप्पा झोडगे आदी उपस्थित होते.

त्यानंतर शिवणी येथील धम्मभूमी महाविहार परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाऊनाना सुरवसे, भगीरथ बांडे, उद्धव म्हेत्रे, अशोक वैद्य, नामदेव म्हेत्रे, महादेव नागरगोजे, आयोजक शाम राऊत, बाळासाहेब डोळस यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. याच उपक्रमाचा भाग म्हणून परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक प्रोत्साहन अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ना. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

पुढील वर्षी नेतृत्वासोबतच वृक्षांचाही वाढदिवस साजरा करूया-शंकर देशमुख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हाभर वृक्षारोपण करण्यात आले. आता पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्याच उत्साहाने हरित उपक्रम राबविले जात आहेत. झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने लावलेल्या झाडाची जबाबदारी स्वीकारून ते जगविले पाहिजे. पुढील वर्षी नेतृत्वाबरोबरच लावलेल्या वृक्षांचाही वाढदिवस साजरा केला पाहिजे. अशा सातत्यपूर्ण प्रयत्नातून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक बळकट होईल, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles