MPSC ‘निपुण सेतू’ योजना: स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी संधी, सरकारी खासगी नोकऱ्यांचे नवे दरवाजे खुले

मुंबई — महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या भरती प्रक्रियेत ‘निपुण सेतू’ योजनेद्वारे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना केवळ सरकारी नोकरीपुरते मर्यादित न राहता खासगी क्षेत्रातही करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षे मेहनत करूनही शासकीय नोकरी मिळवण्यात अपयशी ठरणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

 ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

केंद्रीय स्तरावरील Union Public Service Commission (UPSC) च्या ‘प्रतिभा सेतू’ प्रणालीच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘निपुण सेतू’ योजना राबवली जाणार आहे.या योजनेद्वारे स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांची माहिती थेट खासगी कंपन्यांपर्यंत पोहोचवली जाईल. म्हणजेच, सरकारी नोकरी न मिळाल्यासही गुणवंत उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी वाढणार आहे.

 मोठे बदल काय आहेत?

🔴MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या संवर्गांची संख्या 53 वरून 100 हून अधिक करण्यात येणार

🔴एकाच गुणांच्या आधारे इतर समकक्ष पदांसाठी संधी

🔴वारंवार परीक्षा देण्याची गरज कमी

🔴प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अधिक संधी

🔴भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक

 खासगी क्षेत्रासाठीही खुला मार्ग

या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता MPSC च्या गुणांच्या आधारे खासगी कंपन्यांनाही गुणवंत उमेदवारांची निवड करता येणार आहे.यामुळे मोठ्या उद्योगसमूहांमध्ये करिअर करण्याचा मार्ग खुला होणार असून राज्यातील रोजगार संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 विद्यार्थ्यांसाठी फायदे

सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात संधी,वेळ आणि मेहनतीची बचत,करिअरच्या पर्यायांमध्ये वाढ,गट ‘क’ संवर्गातील भरतीसाठी मोठी संधी

 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेषतः MPSC मार्फत गट ‘क’ संवर्गातील भरती वाढवण्याची मागणी पूर्ण होत असल्याने अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निपुण सेतू’ योजना ही फक्त भरती प्रक्रियेत बदल नाही, तर विद्यार्थ्यांच्या करिअरला नवे आयाम देणारी मोठी क्रांती ठरणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील संधी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत ही योजना महाराष्ट्रातील रोजगार व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles