Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — गेवराई तालुक्यातील मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा ब-हाणपुर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून मावलाई देवी यात्रेनिमित्त पत्रकारिता, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.

यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना “मावलाई श्री समाजसेवा पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, वृक्षारोपण व संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर सातत्याने अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा ब-हाणपुर येथे दि. ०३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शशिकांत शिंगारे यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमोद कुलकर्णी, दिनेश लिंबेकर, सुशील देशमुख, अविनाश वाघिरकर, धनंजय बजगुडे तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बीड आर. एम. मोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच पाडळशिंगी रितेश साबळे, मंडळ अध्यक्ष विष्णू यादव, सचिव भागवत वराट, पांडुरंग पवार, संतोष वराट यांनी केले आहे.
दरम्यान, हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.