बीड — केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल. मस्साजोगच्या नवीन कारभार्याच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा
संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सरपंचपदासाठी सक्रियतेने तयारी सुरू केली आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उमेदवार उभा राहणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
7 ते 13 एप्रिल
अर्जाची छाननी – 15 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – 17 एप्रिल
मतदान – 28 एप्रिल
निकाल – 29 एप्रिल




