Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

परळी — तालुक्यातील धारावती तांडा येथे अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच धर्मापुरी येथे देखील दहा वर्षीय शाळकरी मुलीवर दोन वेळेला अत्याचार झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना घडली. बालाजी पांचाळ वय ५० वर्षे याने दळण आणण्यासाठी गेलेल्या१० वर्षीय एका अल्पवयीन मुलीला दुकानात बोलावून घेतले. तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.याबाबत कुणाला सांगितल्यास तिच्या आणि तिच्या आई-वडिलांच्या जीवाला धोका पोहोचवण्याची धमकी दिली.पीडित मुलीची मानसिक स्थिती बिघडल्याचे पाहून घरी आलेल्या मुलीला आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. दरम्यान मुलीने बालाजी पांचाळ या नराधमाने असेच कृत्य दोन महिन्यापूर्वी देखील केले होते. आजही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याची माहिती आईला दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून २२ मार्च २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१), ६४(२), ६५(२), ७४, ७५(२) आणि पोक्सो कायद्याच्या ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केल्याचे सांगण्यात येते.
या गंभीर प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या पिंक पथकातील ए.पी.आय. जाधवर करत आहेत. आठ दिवसापूर्वी धारावती तांडा येथे देखील अल्पवयीन मुलीला घरात बोलावून घेत हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबत नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.