Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

आष्टी — इंग्लिश बनावटीची पिस्तूल घेऊन चारचाकी वाहन ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्याने येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी कारवाई करत सापळा रचून या चारचाकीसह दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले आहेत.
आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून काही व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली . या रस्त्यावर सापळा लावून राहूल खोटे रा. मूगगाव,अमृत भोसले रा.पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड या दोघांना ताब्यात घेतलं आहे.
यामध्ये दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत त्यांना अटक करण्यात आली आहे. यात इतर आरोपीचा देखील समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरील आरोपीकडे दोन पिस्तूल मिळून आल्याने या पिस्तूल च्या माध्यमातून काही घातपात घडवला जाणार होता का याची चौकशी केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा शोध आता आष्टी पोलीस घेत आहेत. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे,पोलीस निरीक्षक शरद भुतेकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, नितीन काकडे,गणेश जगताप, परमेश्वर तागड,बब्रुवाण वाणी यांनी केली.