कॉपी प्रकरणी चौसाळा महाविद्यालयाच्या केंद्र प्रमुखांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

बीड — चौसाळा येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा ड्रोन व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची बातमी समोर आली आहे.काही पालक खिडक्यांमधून चढून कॉपी पुरवताना दिसले. हा ड्रोन व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी केंद्र संचालकासह 17 शिक्षकाविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौसाळा येथील बारावी परीक्षेदरम्यान कॉपी पुरवतानाचा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला होता.शिक्षण विभागाने हा व्हिडिओ जारी केला असून त्यात परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची बाहेरून मदत किंवा साहित्य पुरवणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचं स्पष्ट केले आहे. असं असूनही, काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मुलांना कॉपी पोहोचवताना दिसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचं गंभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.ड्रोन व्हिडिओच्या आधारे, परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज महसूल अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी रात्री तपासले. जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणात शिक्षक, केंद्रप्रमुख आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात बीडचे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी समंदर हमीद खान पठाण  यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केंद्र संचालक संजय घाडगे,भागवत बब्रुवान कुरुंद दोन्ही कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,चौसाळा ता.जि. बीड, गोरोबा धोंडीराम बचुटे, श्रीमती राजेश्री गोविंद माने, वसीम शेख,आर.जी करडकर
एस.आर दांगट सर्व रा.प्रमीलादेवी कनिष्ठ महाविद्यालय नेकनुर ,विनायक अशोकराव वजे, ताराचंद रेवा राठोड , ए.बी अघाव, पी. के. रसाळ, जी. बी चक्रे सर्व रा. डाॅ. पारनेरकर महाराज विद्यालय मांजरसुंबा, सी.एस मुळीक बी. बी. सुपेकर, यु डी उगले, एम.एस गवई
बालासाहेब दामो पवार सर्व रा.भालचंद्र माध्य उच्य मा. विद्यालय लिंबागणेश यांच्या नावाचा तक्रारीत समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *