Sunday, February 1, 2026

आजीला तिसऱ्या मजल्यावरून उचलून आणलं; परिचारिकेने उर्मट उत्तर देत सोनोग्राफी सेंटरला कुलूप ठोकलं

जिल्हा रुग्णालयातील प्रकाराने संताप

बीड — गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी उभारलेला जिल्ह्याचा सरकारी दवाखाना कर्मचाऱ्यांच्या नंग्या नाचामुळे नेहमीच चर्चेत येत राहते. दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून वयोवृद्ध आज्जीला नातेवाईकांनी सोनोग्राफी सेंटर कडे आणले मात्र परिचारिकेने 15 ते 20 मिनिटे आधीच सोनोग्राफी सेंटरचे दरवाजे बंद केले. नातेवाईकांनी परिचारिकेला सोनोग्राफी करण्याची विनंती केली. परिचारक यांनी मात्र नातेवाईकांसह आजारी आज्जीला उर्मट भाषा वापरून अपमानित केले. हा प्रकार घडत असताना मात्र आज्जी वेदनेने तळमळताना दिसली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे. त्यातच सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची माणुसकी हरवली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वयोवृद्ध पेशंट आजी तिसऱ्या मजल्यावर ऍडमिट होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली होती. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी उचलून आजीला खाली आणलं. सहा वाजेच्या अगोदर सोनोग्राफी सेंटर समोर आले. मात्र सोनोग्राफी सेंटरमधील मस्तवाल परिचारिकेनं पावणे सहा वाजताच स्ट्रेचरवर वयोवृद्ध आजी झोपलेली असताना सुद्धा तिच्याकडे कसल्याही प्रकाराचे लक्ष न देता, पावणे सहा वाजताच सोनोग्राफी सेंटरला कुलूप ठोकलं.नातेवाईकांनी या परिचारिकेकडे विचारणा केली पण, तिने नातेवाईकांना उर्मट भाषा वापरली आणि त्या आजीला तसंच सोडून सेंटर बंद करून निघून गेली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल असं नेहमीसारखं कोरडं उत्तर जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांनी दिलं. हा प्रकार समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सतीश कुमार सोळंके जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारणार का? उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी सोळंके काय उपाययोजना करणार? मुजोर परिचारिकेला निलंबित करणार का? ढेपाळलेल्या कारभाराची घडी पुन्हा नीट बसवणार का? यासारखे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles