Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यापेक्षाही जास्त किंमत असलेल्या व्हेल माशाची उलटी ची तस्करी करणाऱ्या दोन जणांना उलटी सह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. या कारवाईत सव्वा कोटी ची उलटी जप्त करण्यात आली. ही बीड जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.
व्हेल माशाची उलटी ची तस्करी होणार असल्याची माहिती सपोनी बाळराजे दराडे यांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली. ही खळबळ जनक खबर मिळताच पोलीस अधीक्षकांशी त्यांनी संपर्क साधून माहिती सांगितली. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले. बाळराजे दराडे यांनी खबऱ्या मार्फत लक्ष ठेवले. त्यानुसार च-हाटा फाट्यावरून तस्कर कार मधून बीड शहरात येत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार एका हॉटेलजवळ शैलेश प्रभाकर शिंदे वय- 38 वर्ष,रा .हवेली, पुणे व विकास भीमराव मुळे वय-30 वर्ष रा. शिखरवाडी, ता. पाटोदा या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या दोघांकडून सव्वा किलोच्या घरात उलटी जप्त केली आहे. ज्याची किंमत 1 कोटी 21 लाख 50 हजार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या उलटी ची तपासणी करण्यात येतं असून पोलिसांना ही उलटी व्हेलं माशाचीच असल्याचा संशय आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवाजीनगर पोलिसांना व्हेलं सारख्या तस्करीत मोठी कारवाई करण्याची संधी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. सोन्ने, रवी आघाव आदींनी केली आहे.
व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.
शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्याला लागत असल्याचं अभ्यासक सांगतात.
भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीच्या व्यापारावर बंदी आहे, कारण स्पर्म व्हेल एक संरक्षित प्रजाती आहे.
त्यामुळेच एम्बरग्रीसची तस्करी केली जाते आणि अनेकदा पोलिस किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून त्याची जप्ती होते.