Sunday, February 1, 2026

बंजारा महामोर्चाची तयारी पूर्ण;हक्काच्या मागणीसाठी समाज रस्त्यावर

बंजारा कृती समितीकडून पत्रकार परिषदेतून दिली माहिती

बीड —  हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असून महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हा भव्य महा मोर्चा सोमवारी ता.१५ सप्टेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती बीड जिल्हा बंजारा समाज कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले.
गावापासून कोसोदूर राहत वाडी, वस्ती आणि डोंगराळ भागात तांड्यावर वास्तव करणारा हा समाज आजही विकासापासून अनेक मैल दूर आहे. आजही जिल्ह्यातील अनेक तांड्या रस्ता नाही, अनेक तांड्या भोवतीक सोयी सुविधा नाहीत. तरी या समाज आज आपल्या हक्काच्या आणि मूलभूत मागणीसाठी रस्त्यावर येत आहे. तांड्यावरी अनेक महिला भगिनी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढाईत उतरत आहेत. जिल्ह्यातील बंजारा बांधव बहुसंख्येने मोर्चा साठी बीडमध्ये दाखल होणार असल्याचे कृती समितीकडून पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले.

पारंपरिक वेशभूषेत महिला भगिनी होणार दाखल

आज होणाऱ्या मोर्चाला मध्ये जिल्ह्यातील बंजारा बांधव दाखल होणार आहे यात महिला भगिनींही आपल्या पारंपरिक वेशभूषामध्ये मोर्चा सहभागी असणार असल्याचे म्हटले आहे.

असा निघणार मोर्चा

सोमवारी ता.१५ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होणार त्यानंतर सुभाष रोड मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अभिवादन करत मुख्य स्टेज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल होणार आल्याचे म्हटले आहे.

अशी असेल पार्किंग व्यवस्था

मोर्चासाठी बीडमध्ये दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांची कृती समिती व पोलीस प्रशासनाकडून पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. यात माजलगाव गेवराईत रोड वरून येणाऱ्या वाहनांची मोंढा रोड येथील फटका स्टॉलचे मोकळे ग्राउंड तर वडवणी, अंबाजोगाई, धारूर, परळी, केज या रुटचे वाहने माने कॉम्प्लेक्स समोरील मोकळी जागा तर आष्टी-पाटोदा-शिरूर आणि बीड तालुक्यातील वाहने आयटीआय ग्राउंड येथे करण्यात आली आहे.

पाचशे स्वयंसेवक सज्ज

मोर्चात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्ग दाखविन्यासाठी तसेच मोर्चा सुरळीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कृती समितीकडून टी शर्ट देत पाचशे स्वयंसेवक सज्ज करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles