बीड — गेवराई तालुक्यातील गैबी तांडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने आज छापा मारला. या कारवाईत आठ लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील गैबी तांडा येथे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. गेवराईतील काही जण बी.एस.एन.एल टॉवरचे समोरील संभाजी नाटकर यांच्या ऊसाच्या शेतातील पत्र्याचे शेडचे बाजुला ऊसाचे शेतामध्ये पैश्याची बाजी लावुन हार जीत चा तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळाली. यावरून या ठिकाणी दोन पंचासमक्ष जावुन छापा टाकला असता आठ जण गोलाकर रिंगण करुन तिरट खेळताना दिसले.यातील एक पोलीसांना पाहुन ऊसाच्या शेतामध्ये पळुन गेला.उर्वरीत सात इसमांना ताब्यात घेतले.त्यांची नावे संभाजी नाटकर रा.राक्षसभुवन, किशोर प्रधान रा.धोंडराई ,अनिल राठोड रा.ठाकरवाडी तांडा, पिकाजी राठोड रा.कुंभेजळगाव, संजय शिंदे रा.धोंडराई , रविंद्र कोठी रा.गेवराई , शेख जावेद रा.राक्षसभुवन अशी आहेत . आरोपींच्या ताब्यातुन चार मोटार सायकल ,एक चार चाकी वाहन व 10हजार 800 रोख रक्कम असा एकुण 08 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर सात आरोपी विरुध्द चकलंबा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान ही कारवाई पोउपनि महेश विघ्ने , पोह.महेश जोगदंड, राजु पठाण, राहुल शिंदे, पो शि.बप्पासाहेब घोडके, चालक गणेश मराडे यांच्या टीमने पार पाडली

