बीड — वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील उपळी या गावात गोवंशांची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून 400 किलो गोमांस जप्त केले असून आरोपीला जेरबंद केले आहे.
उपळी या गावात एक इसम गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती वडवणी प्रभारी वर्षा व्हगाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे फिरोज सिकंदर कुरेशी वय 35 वर्ष, राहणार उपळी हा त्याचे घरामध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करताना मिळून आला. पोलिसांनी घटना स्थळावरून 80 हजार रुपये किमतीचे 400 किलो वजनाचे गोवंश जनावरांचे मांस, लोखंडी सुरे व लाकडी ओंडका जप्त केला. सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विष्णू जायभाये करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, संदीप चव्हाण, पोलीस अंमलदार विष्णू खरात, किरण इरमले, वसंत करे यांनी केली

