छत्रपती मल्टीस्टेटने केली फसवणूक; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड — मल्टीस्टेट बँकांनी गुंतवणूकदारांच्या कोट्यावधीला केलेल्या फसवणुकीच सत्र कायम आहे. गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बीड शाखेने ठेवीदाराची 27 लाख 16 हजार 329 रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आप्पाराव नरहरी उबाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोसायटीचे चेअरमन संतोष भंडारी यांनी व्याजदराचे आमिष दाखवून पैशाची गुंतवणूक करायला लावली. 13 टक्के व्याजदर ठरवून फिक्स डिपॉझिट तसेच खात्यावर जमा असलेले माझ्यासह साक्षीदाराची एकूण 27 लाख 16 हजार 329 रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी आप्पाराव उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव शहाणे संतोष बसवंत भंडारी उपाध्यक्ष आरती संतोष भंडारी संचालक विठ्ठल पांडुरंग रुचके राजू सतीश काळे लक्ष्मण रतन पवार बाबासाहेब आसाराम दाभाडे किरण अरुण तौर आणि प्रवीण प्रल्हाद मुळे या नऊ जणांविरोधात कलम 420 406 409 34 भादवि कलम 3,4 एम पी आय डी अधिनियम 1999 प्रमाणे बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय कुमावत करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles