बीड — जालना रोडवरील बँक कॉलनी मध्ये पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय पीडित महिलेची सुटका केली या प्रकरणी तीन जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोघांना अटक करुन तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. शकुंतला सुरेश राऊत वय40 वर्ष, रा. फ्लॅट नं. 02, राम अंश अपार्टमेंट, इंडिया बँक कॉलनी, बीड, महेश मोहनराव चांदणे वय 33 वर्ष, रा. गया नगर, बीड व मुमताज नासिर शेख रा. गेवराई या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जालना रोडवरील इंडिया बॅंक कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती, अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्होगाडे यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकला असला एका महिलेच्या माध्यमातून परराज्यातील महिलेकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद (कोलकत्ता) येथील पिडीतेची कारवाईत सुटका करण्यात आली. पोलिसांनी शकुंतला राऊत, महेश चांदणे व मुमताज नासिर शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शकुंतला राऊत हिच्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. मुमताज शेख महिलांची व्यवस्था करत असे, तर दलाल महेश चांदणे त्याच्या रिक्षातून महिलांची ने-आण करीत असे, ही बाब कारवाईत समोर आली.पोलिसांनी शकुंतला राऊत व महेश चांदणे यांना अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत कारवाया झालेल्या आहेत.
कारवाईत वर्षा व्हगाडे, संजय सुरवसे, अशोक शिंदे, प्रदीप येवले, अनिता माने, मनीषा खरमाटे यांचा सहभाग हेाता.

