बीड — नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून वयस्कर महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याची घटना अंबाजोगाईत घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीला अटक करून कानातील झुंबर हस्तगत करण्यात यश मिळवले.
अंबाजोगाईच्या बस स्थानकात वयस्कर महिलेस समोर सोन्याची नकली बिस्किट एका चोरट्याने रस्त्यावर टाकली. त्यानंतर तिथे दुसरा आरोपी आला त्याने स्वतः जवळची डुप्लिकेट अंगठी पहिल्याला दिली तसेच त्याच्याकडून सोन्याचे बिस्किट घेतले त्याच वेळी महिलेला सोन्याचे बिस्किट देतो असे आमिष दाखवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले त्या बदल्यात सोन्याचे बिस्किट दिले मात्र हे बिस्किट बनावट असल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोह महेश जोगदंड, जफर पठाण यांना महिलेचे दागिने लुटणारा आरोपी आडस फाटा येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सतीश शिवाजी जाधव वय 34 वर्ष रा. भातखेडा तालुका जिल्हा लातूर याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मित्र बालाजी गायकवाड यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे झुंबर जप्त केले असून आरोपी बालाजी गायकवाड हा अद्याप फरार आहे.