Monday, February 2, 2026

वाल्मीक कराडसह फरार आरोपींचे बँक खाते सीआयडी कडून सिज; देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याची बाब उघड!

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामूळे वातावरण सध्या तापलेले आहे. बीडच्या रस्त्यावर जनतेच्या असंतोषाचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान हे प्रकरण सीआयडी कडे गेल्यानंतर फरार आरोपी वाल्मीक कराड सह चारही आरोपींचे बँक खाते सीज करण्यात आले आहे. संपत्ती जप्तीची कारवाई सीआयडीने सुरू केली असून संतोष देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याचे तपासातून उघड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

शनिवारी बीडच्या रस्त्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायासाठी जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. जनक्षोभ लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडणी व देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याच्या आदेश सीआयडीला दिले. यानुसार सीआयडीने वाल्मीक कराडसह फरार असलेल्या चारही आरोपींचे बँक खाते सिज करून संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली आहे. खून व खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी ची नऊ पथक सध्या करत असून जवळपास दीडशे अधिकारी व कर्मचारी ही जबाबदारी संभाळत आहे. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात संतोष देशमुख खून झाला त्यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीतील बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशाशी मॅच झाले आहेत. दरम्यान गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या गाडीत सापडलेल्या दोन मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात सीआयडी ला यश आले आहे. तसेच संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याची संपर्क साधल्याची बाब देखील तपासात उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी केलेल्या चित्रीकरणातून देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केली असल्याची बाब उघडकिस आली आहे. सीआयडी ची पथक फरार आरोपींचा तपास राज्यासह देशभरात सध्या करत आहे. आरोपींच्या संपत्ती जप्ती सोबतच त्यांनी देशाबाहेर पलायन करू नये यासाठी पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई सुरू केली असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles