Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

गेवराई फटाके वाद हाणामारी मध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. शहरातील पवार गल्ली परिसरात दोन गटांत झालेल्या संघर्षात…
गेवराई — फटाके फोडण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान रक्तरंजित हाणामारीत झाले. शहरातील पवार गल्ली परिसरात दोन गटांत झालेल्या संघर्षात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याने एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. या घटनेमुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खडके हे पत्नी आणि मुलीसह रिक्षातून घरी जात होते. यावेळी पवार गल्लीतील मशिदीजवळ काही तरुण फटाके फोडत होते. फटाक्याची ठिणगी खडके यांच्या मुलीच्या अंगावर पडल्याने दोन्ही बाजूंमध्ये वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

वाद वाढताच काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. अंगावर, मानेवर आणि पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात एका महिलेलाही मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत सार्थक सुनील खडके (वय 21), मनीषा सुनील खडके (वय 42), ओम गणेश खडके (वय 19), सुनील सुधाकर खडके (वय 50) आणि मंगेश शिवाजी गोरे (वय 19) हे पाच जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंगेश गोरे यांच्या मानेवर आणि छातीवर गंभीर वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून, त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धराज सुकाळे आणि जमादार सोनवणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जखमींचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणाती संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
गेवराई फटाके वाद हाणामारी या घटनेनंतर गेवराई शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
गेवराई फटाके वाद हाणामारी प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जखमींवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
📌 हे देखील वाचा
👉 सह्याद्री माझा – बीड जिल्ह्यातील इतर ताज्या बातम्या वाचा
🔗 स्रोत: बीड जिल्हा प्रशासन – अधिकृत वेबसाईट