पेठ बीड चे कारभारी च केळे; हातभट्टीची झिंग, मटक्याचा खटका चक्रीच्या नादात प्रशासन बूळे

Spread the love

पेठ बीड पोलीस ठाणे – पेठ बीड पोलीस ठाण्याचा वारसा कायम ठेवत…

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा युवा सेना बीड जिल्हा

- जाहिरात -

बीड — पेठ बीड पोलीस ठाण्याचा वारसा कायम ठेवत नवीन आलेले ठाणे प्रमुख निलेश केळे यांनी हातभट्टीची झिंग कायम ठेवत गरिबांना देशोधडीला लावायचा मटक्याच्या खटक्यावर बोट ठेवत चक्रीचा नादात कायदा सुव्यवस्था संभाळणारे प्रशासनच बूळे करून ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ठाणे प्रमुख निलेश केळे यांनी पदभार घेतल्यानंतर पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गोरगरिबांना देशोधडीला लावणारा मटका जुगार राजरोस सुरू आहे. या धंद्यातून सु-भाष करणारे मोटे मोटे कर्मचारी वसुली करण्यात मग्न आहेत.

बीड जिल्ह्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा

पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत काय सुरू आहे?

अवैध धंद्यांना पाठबळ देताना हातभट्टी, ताडी, नकली बनावटी दारू विक्रीला देखील चालना दिली आहे. शाळा महाविद्यालय मंदिर यांच्या जवळ दारू विक्री करता येत नसली तरी अशोक नगर जिल्हा परिषद शाळेच्या जवळच हातभट्टी सारखे व्यवसाय सुरू करून आदर्श पिढी घडवण्यासाठी केळे यांनी मोठे योगदान देण्याचा ठरवलं आहे. बार्शी नाक्यावरील गणपती मंदिरा शेजारीच नकली, देशी-विदेशी व हातभट्टी दारू विक्री सुरू ठेवत हिंदूंच्या भावनांशी खेळ मांडला आहे. हे कमी काय काय म्हणून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून 100 ते 150 फुटापर्यंत सुरू असलेल्या चक्री जुगारातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा काम त्यांनी केला आहे. बाहेरच्या माणसाला संशय येऊ नये म्हणून हॉटेलचा बोर्ड लावून हातभट्टी सारखे व्यवसाय सुरू आहेत.

पेठ बीड चे कारभारीच केळे - हातभट्टी मटका चक्री जुगार
निलेश केळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अघटीत घडवायचंच असं ठरवून बार्शी नाक्यावरील पोलीस चौकी शेजारीच चक्री जुगाराला पाठबळ दिलं. पोलीस चौकी आहे म्हटल्यानंतर त्या भोवताल च्या परिसरावर संशययाने सुज्ञ माणूस पाहणारच नाही ही त्या मागची खेळी आहे. एकूणच काय तर केळेंच्या कारकिर्दीत कायदा सुव्यवस्था संभाळणारी यंत्रणाच त्यांनी बुळी करून ठेवल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाला आहे. या अवैध धंद्यातून होणाऱ्या कमाईतला हिस्सा हप्ता वसुली म्हणून करण्याचं काम मोटे नावाचा कर्मचारी करत आहे.

पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत काय सुरू आहे याचा फटका सामान्य माणसाला कसा बसतोय?

पेठ बीड परिसरातील अशोक नगर जिल्हा परिषद शाळेजवळच हातभट्टी सुरू झाल्याने पालकांमध्ये भीती आहे. शाळा सुटल्यावर मुलं याच रस्त्याने जातात. दारू पिऊन भांडणं, शिवीगाळ हे रोजचं झालंय. माझ्या मुलाला शाळेत पाठवायची भीती वाटते, असं एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. शाळा, मंदिर यांच्या जवळ दारू विक्रीला कायद्याने बंदी असूनही पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत ही बंदी फक्त कागदावरच राहिली आहे.

बार्शी नाक्यावरील गणपती मंदिरा शेजारीच नकली आणि हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याने भाविकांमध्ये संताप आहे. सकाळी दर्शनाला जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना या दुकानासमोरूनच जावं लागतं. मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न आहे, पण तक्रार करायची तरी कुणाकडे, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. हिंदूंच्या भावनांशी खेळ मांडला जातोय, असं मंदिर परिसरातील दुकानदार म्हणतात.

सगळ्यात मोठा फटका बसतोय तो गरीब कुटुंबांना. रोज 300-400 रुपये कमावणारा मजूर संध्याकाळी मटक्यात, चक्रीत पैसे घालवतोय. घरात भाजीला पैसे नाहीत, पण मटक्याला पैसे आहेत, अशी अवस्था अनेक घरात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून 100 ते 150 फुटावर चक्री जुगार सुरू असून, तरुण पोरं यात अडकत चालली आहेत. एकदा व्यसन लागलं की घर उद्ध्वस्त करण्याचं हे षडयंत्र असल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करा

सह्याद्री माझा – बीड जिल्ह्यातील इतर बातम्या वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *