Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीडमध्ये वाघाचा हल्ला झाला असून आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आष्टी — बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनावरांसाठी गवत कापण्यासाठी गेलेल्या देवळाली येथील देविदास टकले यांच्यावर लोखंडवाडी-सोनेपठार परिसरात वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना जंगलात सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन ठार केल्याची माहिती आहे. वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनीही या घटनेत वाघाचाच हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीडमध्ये वाघाचा हल्ला झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली येथील शेतकरी देविदास टकले हे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी लोखंडवाडी-सोनेपठार परिसरात गेले होते. ते गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने पाठीमागून अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यानंतर वाघाने त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेल्यानंतर वाघाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले.
रम्यान, मुलाच्या आरडाओरडीनंतर वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तोपर्यंत देविदास टकले यांचा मृत्यू झाला होता. वडील बराच वेळ घरी परतले नसल्याने मुलगा त्यांना शोधण्यासाठी पुन्हा शेतात गेला. त्यावेळी परिसरात रक्ताचे डाग आणि फरफटत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यानंतर ग्रामस्थांना सोबत घेऊन शोध घेतला असता डोंगर परिसरात देविदास टकले यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेने दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा समोर आणल्या आहेत. पावसाअभावी जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना गवताच्या शोधात शेतशिवार आणि डोंगराळ भागात जावे लागत आहे. चारा छावण्या सुरू नसल्याने मुक्या जनावरांची भूक भागवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून चारा आणावा लागत आहे. अशातच चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. टकले यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या तीन वर्षांत आष्टी तालुक्यात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देवळाली, बावी आणि धामणगाव परिसरात वाघांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांचा वावर वाढत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर शेतकरी आक्रमक झाले असून परिसरातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वनविभागाने याबाबत त्वरित पावले उचलली नाहीत, तर वनविभाग कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मोहन आमटे यांनी दिला आहे.
दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी या घटनेत वाघाचाच हल्ला झाल्याचे सांगितले आहे. तसेच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी जंगलालगतच्या भागात वावरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. विशेषतः शेतात चारा कापण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी रक्ताचे डाग, चप्पल, विळा, गवताच्या पेंड्या आणि कपडे आढळून आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग कोणत्या उपाययोजना करणार, याकडे आता परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
बीडमध्ये वाघाचा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हे देखील वाचा: बीड जिल्ह्यातील इतर ताज्या बातम्या वाचा
अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र वनविभाग अधिकृत संकेतस्थळ
🌳 वाघ किंवा बिबट्या दिसल्यास तात्काळ कळवा