इंदौरचा हिस्ट्रीशीटर बीडमध्ये पिस्तूलासह जेरबंद; दोन जिवंत काडतुसेही जप्त

Spread the love

बीड — दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इंदौरचा कुख्यात हिस्ट्रीशीटर करण दुर्गा भटनागर याला बीड शहरातील सागर हाइट्स परिसरात गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई

दि. 7 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि त्यांचे पथक बीड शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत करण दुर्गा भटनागर हा शहरातील सागर हाइट्स परिसरात महाराजा ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी शिवाजी चौक परिसरात धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता निळसर रंगाच्या बॅगेत गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मॅगझिनसह आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.

हिस्ट्रीशीटर

हिस्ट्रीशीटर विरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल

ताब्यात घेतलेल्या करण दुर्गा भटनागर याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अमळनेर पोलीस ठाण्यात 2020 मध्ये खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस ठाण्यात 2021 मध्ये शस्त्र अधिनियमांतर्गतही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस हवालदार अशोक दुबाले, आनंद मस्के, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब सानप आणि चालक पोलीस अंमलदार सिद्धेश्वर मांजरे यांचा सहभाग होता.

हे देखील वाचा: बीड जिल्ह्यातील इतर ताज्या बातम्या वाचा

अधिक माहितीसाठी: बीड जिल्हा पोलीस अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *