Home क्राईम गेवराईत जुगार अड्ड्यावर धाड; 14 जण ताब्यात, 6.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराईत जुगार अड्ड्यावर धाड; 14 जण ताब्यात, 6.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7

गेवराई गेवराई शहरालगत जतेगाव रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने रात्री धडक कारवाई केली. 10 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत 14 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, 14 मोबाईल आणि 8 दुचाकी असा एकूण 6 लाख 72 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे जतेगाव रोडवरील एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी काही इसम गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत राम चव्हाण, सय्यद फय्याज, अशोक भावले, संतोष नेवाळे, शेख तौफीक, अशोक धापसे, जमील शेख, जमील कुरेशी, गणेश चव्हाणकर, कृष्णा खरात, अमित पाडाळे, शेख आवेज, संतोष पाटील आणि करण नराडे यांना ताब्यात घेतले.

कारवाईत विविध कंपन्यांचे 14 मोबाईल फोन, 8 मोटारसायकली आणि रोख रक्कम असा एकूण 6,72,540 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 मधील कलम 12 (अ) अन्वये गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here