लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Spread the love

बीड — महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने कॉफी शॉप आणि लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीची अभिषेक मोटे नावाच्या तरुणाशी ओळख झाली. यानंतर या तरुणाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून शहरातील कॉफी शॉप व एका लॉजवर नेऊन अत्याचार केले. सततच असे प्रकार करु लागल्याने कंटाळून अखेर पीडित मुलीने हिम्मत दाखवून थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची तक्रार केली. या तक्रारीवरुन आरोपी अभिषेक सुखदेव मोटे वय 22 वर्ष रा. उदंड वडगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *