देवपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर गेवराई पोलिसांची कारवाई

Spread the love

गेवराई — पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत देवपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व मोटारसायकलींसह एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या निर्देशानुसार गेवराई पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता अंतरवलीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यालगत, देवपिंपरी शिवारातील गायरान जमिनीवरील गोठ्यात सुरू असलेल्या ‘तीर्रट’ जुगारावर अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान सहा जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत रोख रक्कम आणि मोटारसायकली असा एकूण 4.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सरकारतर्फे दाखल फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 411/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुंदर राठोड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, सुंदर राठोड, रविंद्र राऊत, धनंजय सुळ आणि रामराजे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *