“दुधारी तलवार” ठरली कारवाई; नेकनूरमध्ये गोवंश तस्करी अन् जुगार अड्ड्यावर धडाधड धाडी

Spread the love

बीड — नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत मटका, जुगार, गोवंश तस्करी, अवैध दारू विक्री, रसायन युक्त ताडी यासारखे धंदे राजरोस सुरूच आहेत. हप्तेखोरीमुळे “सा”हेबांचे “बळे“च कर्तव्यदक्षतेचा आव आणून कारभार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी
सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने कत्तलीच्या उद्देशाने आणून दाटीवाटीने शेडमध्ये ठेवलेल्या 36 गोवंशीय जनावरांची सुटका करत 31 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी मांजरसुंबात छापा मारून जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत तब्बल 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीला खतपाणी घालणारे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरूच आहेत. पोलीस ठाण्याचा कारभारी बदलला मात्र अवैध धंदे करणारे “मागे उभा “मंगेश” पुढे उभा “मंगेश”माझ्याकडे देव माझा पाहतो आहे.असं गीत गात आनंदी मनाने कारभार हाकत आहेत. या कारभारा विरोधात ठाणे प्रमुखांचे कारवाई करताना मात्र “सा”हेबांचे “बळे” च आव‌ आणत कर्तव्यदक्षतेचे निर्माण करत असलेले चित्र पितळ उघडे पाडणारा दिवस अखेर उजाडलाच. नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत मटका, धाब्यावरून सुरू असलेली अवैध दारू विक्री, रसायन युक्त ताडी, मटका ,जुगार अड्डे कसे चालू आहेत याचं बिंग अखेर फुटलं गेलं.

नेकनूर मधील सरकारी डीएड कॉलेज समोरील एका शेडमध्ये कत्तलीसाठी तसेच तस्करीसाठी गोवंश जनावरांना डांबून ठेवल्याची माहिती ‌सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना मिळाली त्यांनी तात्काळ या ठिकाणी छापा मारून 36 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले आयशर वाहन क्रमांक MH-17-AG-5439 पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल सहा लाखाची जनावर तसेच 25 लाखाचा आयशर असे मिळून 31 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे कमी होतं की काय म्हणून मांजरसुंबा येथील विराज बिअर बारच्या वरच्या मजल्यावर ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कार्यरत आहे. या ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ कारवाई करत या ठिकाणी धाड टाकली. या जुगार अड्ड्यावरील सोयी सुविधा पाहून पोलीस पथकालाही धक्का बसला
पत्ते खेळण्यासाठी टेबल-खुर्च्यांची व्यवस्था, पत्त्यांचे कॅट, विविध रंगांचे टोकन, सभासद ओळखपत्रे आणि उपस्थितीच्या नोंदी या ठिकाणी आढळून आल्या. याचाच अर्थ पोलिसांची कुठलीही भीती या जुगार अड्डा मालकाला नव्हती. तोही मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हेच गीत गात आपलं साम्राज्य उभा करत चालला होता. पोलीस अधिकारी भारत पांढरे यांनी टाकलेल्या छाप्यात 19 जण ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे 55 हजार 600 रुपये रोख मिळून आले. मोबाईल वाहने इतर साहित्यांचा विचार केला तर मुद्देमाल जप्तीचा आकडा 72 लाख 86 हजार रुपया पर्यंत पोहोचला. या सलग झालेल्या कारवाया तसेच नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा विचार केला तर दुष्काळाच्या तोंडावर अनेकांच्या संसाराची होरपळ होताना साक्षात गोविंदा “व्यंकटरमना” असं म्हणत देवाला साकडे घालण्याची वेळ आली आहे. साकडे न घातल्यास हप्ते खोरीतून आपले उखळ ” पांढरे” करून घेत “भारता” च्या जनतेचे होणारे हाल साक्षात शिव (मंगेश) देखील रोखू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *