Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

वडवणी — तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथे ऊस आणि कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या कारवाईत तब्बल ११६ गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, ही झाडे सहा ते सात फूट उंचीची आहेत. जप्त गांजाची किंमत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हरिश्चंद्र पिंपरी येथील संदीपान विठ्ठलराव शिंदे (वय ४०) यांच्या शेतात ऊस आणि कापसाचे पीक आहे. या पिकांच्या आड गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शेतात कारवाई केली असता ऊस-कापसाच्या पिकामध्ये गांजाची ११६ झाडे आढळून आली.
पोलिसांनी गांजाची झाडे ताब्यात घेतली असून घटनास्थळी पंचनामा आणि वजन करण्याची प्रक्रिया सुरू होती. वजन व पंचनामा पूर्ण झाल्यानंतर जप्त मुद्देमालाची अधिकृत किंमत स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेतीतील नियमित पिकांच्या आड अमली पदार्थाच्या पिकाची लागवड केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई डीवायएसपी अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा , उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आदींच्या पथकाने केली.