माऊली ग्रुप व राजेश चरखा माध्यमातून विद्यार्थ्यांना केली मदत
दुर्गादास लांब यांच्या माध्यमातून बनकरंजा जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाचे आयोजन

केज — ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ( मंत्री महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व पर्यावरण वातावरणीय बदल ) यांच्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत, बीड येथील राजेशजी चरखा ( कोषाध्यक्ष, बीड शहर ) , महादेव नागरगोजे ( तालुका सरचिटणीस बीड ), अमोल वडकिले , कंडू कटले , संतोष गवळी , भालचंद्र कुलकर्णी, सुरेश खराटे , दुर्गादास लांब , यांच्या माध्यमातून ना. पंकजाताई यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग) बनकरंजा जिल्हा परिषद शाळा तालुका केज या ठिकाणी मोफत वाटप करण्यात आले.

सध्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे कठीण जाते. हीच बाब लक्षात घेऊनदप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन बनकरंजा येथे दुर्गादास लांब यांच्या माध्यमातून करण्यात आले
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक कुरवडे सर प्रमुख पाहुणे राजेश चरखा यांच्यासह बीड येथील माऊली ग्रुप चे सर्व पदाधिकारी व बनकरंजा गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते यांच्या राजेश चरखा व माऊली ग्रुप बीड यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा बनकरंजा ता. केज येथील 190 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले याप्रसंगी गावातील विष्णू शंकर नागरगोजे, यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिक, मान्यवर तथा शाळेतील सर्व शिक्षक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य अतिथींनी सांगितले की, “वाढदिवसावर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा अशा सामाजिक उपक्रमांतर्गत गोरगरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळेल.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश चाटे सर यांनी केले, तर उपस्थित ग्रामस्थ व लहान मुलांनी वाढदिवसानिमित्त ना. पंकजाताई मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

