नीट पेपरफुटी प्रकरण : आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपकेला जयपूरमध्ये मारहाण

जयपूर —  नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर आंदोलन करण्याची घोषणा करणारे अभिजीत दिपके यांना जयपूर येथे आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली 6 जून रोजी नवी दिल्ली आणि 11 जून रोजी पुणे येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी लखनऊ, जयपूर आणि अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

जयपूरमध्ये आंदोलनाची तयारी; पोलिसांनी दिली होती सशर्त परवानगी

कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) जयपूर येथील शहीद स्मारक परिसरात NEET पेपरफुटी, शैक्षणिक सुधारणा, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जयपूर पोलिसांविरोधात निदर्शने केली.

यानंतर पोलिसांनी आंदोलनासाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर अभिजीत दिपके जयपूरमध्ये दाखल झाले होते.

मंचाकडे जात असताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून आंदोलनस्थळी मंचाच्या दिशेने जात होते. याचवेळी काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिपके यांच्या गळ्यातील उपरणे ओढताना आणि त्यानंतर त्यांना मारहाण करताना दिसत आहे.

घटनेनंतर दिपके यांच्या समर्थकांनी संबंधित व्यक्तीला पकडले. काही काळ आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याला विधायकपुरी पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर जयपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मारहाणीच्या प्रकाराबाबत पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवण्यात आले.

NEET पेपरफुटी प्रकरण, धर्मेंद्र प्रधान राजीनामा मागणी आणि जयपूरमधील अभिजीत दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना आता चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles