बीड — आरएसएस च्या विचारधारेने भाशिप्र मध्ये मांडीवर घेतलेल्या ” बबड्या” कायद्याच्या आयचा घोऽऽ! म्हणत सेवा जेष्ठता यादी डावलत सावरकर च्या मुख्याध्यापक पदावर विराजमान झाला. इतकच नाही तर त्याच शिक्षण संस्थेत संचालक ही झाला. हे कमी की काय म्हणून “चंपावती” शिक्षण संस्थेत शिक्षण सभापतीपदही मिळवलं. या दोन्ही ठिकाणी त्याने भ्रष्टाचाराच्या “चंद्र”कला दाखवत पाळे”मुळे” खोलवर रुजवली असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे.
भाशिप्र संस्थेत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवताना लाडक्या “बबड्या” ने कायदे व नियमांची विल्हेवाट कशी लागवायची यामध्ये डॉक्टररेटच मिळवली. याच ज्ञानाचा फायदा उचलत सेवा जेष्ठता यादीला फाट्यावर मारत सावरकर मध्ये मुख्याध्यापक पदं मिळवलं. एवढ्यावरच त्याची भूक शांत झाली नाही. भाशिप्र उभा करताना ज्या लोकांनी रक्ताचं पाणी केलं कुठलाही स्वार्थ न पाहता संस्था नावारूपाला आणली त्यांच्याच मुंडक्यावर पाय देऊन संचालक पद पदरात पाडून घेतलं.विशेष म्हणजे संस्काराचे धडे लोकांना शिकवणाऱ्या विचारधारेने हा दुसऱ्याचा “बबड्या” स्वतःच्या कसा मांडीवर घेतला असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. चला आपलाच माणूस संचालक झाला ही भावना ठेवून कोणीच अक्षेप घेतला नाही.मग काय चौफेर “चंद्र”कला दाखवायला मैदान मोकळ सापडलं पाळे”मूळे“खोलवर रूजवत मार्गात येणारे प्रत्येक अडथळे दूर करत हा कधी लाडका झाला ते कुणालाच कळले नाही. जिथे जिथे खायला मिळेल तिथलं तिथलं अन्नद्रव्य शोषून घेत संस्थेची वाढ खुंटविण्यात मोलाची कामगिरी पार पाडली. त्यासाठी शासकीय नियमांची, कायद्याची ऐसी की तैसी करत बनावट कागदपत्रांचा आधार घेत शोषणाला सुरुवात केली. संस्था ओसाड करताना स्वतःची वाढ कशी होईल याकडेच प्राधान्याने लक्ष दिलं.
हे कमी होतं की काय म्हणून एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या नामवंत चंपावती शिक्षण संस्थेत देखील प्रवेश मिळवला. संस्थेत महत्त्वाचा असलेलं शिक्षण सभापतीपद पदरात पाडून घेतलं. यावेळी खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम’ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम (Public Trust Act) अंतर्गत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संस्थांच्या संचालक किंवा विश्वस्त मंडळात राहण्यावर निर्बंध आहेत तरीही हे घडलं.
दोन वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये एकाच वेळी संचालक किंवा कार्यकारी पदावर राहणे म्हणजे हिताचा संघर्ष (Conflict of Interest) निर्माण होण्यासारखे आहे. एका संस्थेचे हित जपताना दुसऱ्या संस्थेच्या हिताला बाधा पोहोचू शकते याचा विचार केला जातो.
सावरकर च मुख्याध्यापक हे पद शाळेच्या दैनंदिन प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाजासाठी पूर्णवेळ (Full-time) आहे. त्यामुळे दुसऱ्या संस्थेच्या शिक्षण सभापतीपदाची जबाबदारी सांभाळल्यास मुख्याध्यापक पदाच्या मूळ कर्तव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असलेले निर्बंध देखील विचारात घेतले गेले नाहीत. विचारात का घ्यायचे? ते संस्कारातच नाहीत तर अंमलात कसे येणार? हा मोठा प्रश्न आहे. दोन्हीही संस्थांच हित महत्त्वाचं की स्वतःच्या तुंबडी भरण्याचं हित महत्त्वाचं? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. परिणामी एकेकाळी सुवर्णयुग अनुभवलेली चंपावती शिक्षण संस्था देखील आज मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसू लागली आहे. भाशिप्र संस्था असो की चंपावती शिक्षण संस्था असो दोन्हींचाही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बोन्साय करतांना कायद्याच्या आयचा घोऽऽ! म्हणत सुरू असलेल्या नंगानाचाला आळा बसणार का? लाडका “बबड्या” अशीच घाण करत राहणार का? दोन्हीही शिक्षण संस्था डबघाईला येणार का? लाडका “बबड्या” शिक्षण संस्थेसोबतच संघ विचारधारेला देखील बदनामीच्या गर्तेत घालणार का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

