Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ०६ एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी RTE २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी (६ एप्रिल) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे शिक्षण आयुक्तांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. सोडत काढल्यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी जाहीर केली जाणार आहे.
यंदा आरटीई प्रवेशांसाठी जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये २ हजार ४२२ जागा उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये ८ हजार ८४८ अर्ज दाखल झाले होते. यापैकी २ हजार ५२६ अर्ज अनकन्फर्म असल्यामुळे ६ हजार ३२२ अर्ज पात्र ठरले आहेत. आता या पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या लॉटरी पद्धतीने ठरणार आहे.
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना पाल्यांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिली जात असल्यास अशा प्रलोभनांना बळी पडू नये. प्रवेशाबाबत कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आल्यास जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय (depmah2@gmail.com) तसेच शिक्षण आयुक्त (educommoffice@gmail.com) यांच्याकडे समक्ष किंवा ई-मेलद्वारे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तालुका निहाय आकडेवारी
तालुके (शाळा) (प्रवेशाच्या ) (दाखल अर्ज)
जागा
अंबाजोगाई — ३४ — ३००. — १०३२
आष्टी. — १०— १०२ — ९३
बीड. — १७ — २३१ — १५५१
धारुर. — ०८ — १३१ — २४४
गेवराई — ३६ — ३८७– ९९३
केज — २२ — २१६ — ३८७
माजलगांव — २७ — २६८ — ७४९
परळी. — २३ — २९४ — ८०७
पाटोदा –०३ — ३३ — १०२
शिरूर. — ०७ — ७७ –१९१
बीड शहर — २० –३२० –११३
वडवणी — ०७ — ६३ — ६०
एकूण –२१४ — २४२२ — ६३२२