Thursday, February 12, 2026

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बीड — येथे 174 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान बुधवारी (दि.11) दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर वाव्हळ रा. मांडेखेल.ता. परळी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता. भरती दरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असतानाच अचानक मैदानावर भोवळ येऊन कोसळला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. डीहायड्रेशन मुळे हार्ट अटॅक आला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे ‌

दीपकचे आई-वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक याचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. उपजीविकेसाठी दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबात कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणाऱ्या या युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles