Wednesday, February 11, 2026

मजुरीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग; तोंडाला चावा घेत महिलेने केली सुटका

केज — गेल्या दोन वर्षापासून नवरा बेपत्ता असल्याचा गैरफायदा घेतऊस बांधणीसाठी शेतात मजुरीसाठी जात असलेल्या विवाहित महिलेचा रस्त्यात अडवून वाईट हेतूने विनयभंग करण्याचा एकाने प्रयत्न केला मात्र पीडित महिलेने धाडसी प्रतिकार करत आरोपीच्या तोंडाला चावा घेतला, त्यामुळे आरोपीने पळ काढला.६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील ही महिला रोजंदारीने ऊस बांधणीचे काम करण्यासाठी एकटीच पायी शेताकडे जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर झटापट करत वाईट हेतूने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने त्याच्या तोंडाला जोरदार चावा घेतला. त्यामुळे जखमी झालेल्या आरोपीने तिला सोडून घटना स्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ आपल्या दीर, जाऊ व सासू यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून अजहर अशरफ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११५(२) तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कलम ३(१)(आर), ३(१)(डब्ल्यू)(i) व ३(१)(डब्ल्यू)(ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत. दरम्यान
पीडित महिलेने प्रसंगावधान राखत केलेल्या प्रतिकारात आरोपीच्या तोंडाला जोरदार चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपीची परिसरात चांगलीच चर्चा होत असून त्याच्या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. पीडित महिलेचा पती गेल्या दोन वर्षापासून बेपत्ता असून या प्रकरणात पोलीस दप्तरी नोंद देखील करण्यात आलेली आहे. पीडित महिलेच्या याच परिस्थितीचा फायदा घेण्याचा आरोपीने प्रयत्न केला असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles