Wednesday, February 11, 2026

माजलगाव: नगराध्यक्ष पती बिलाल चाऊस कडून न.प.कर्मचाऱ्यास बेदम मारहाण?

माजलगाव — पी टी आर विभागातील कामावरून झालेल्या वादातून नगराध्यक्ष शिफा बिलाल चाऊस यांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी दादागिरी करत अक्षय धारक या न प कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची खळबळ जनक घटना गुरुवारी दुपारी घडली.
नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून शिफा बिलाल चाऊस या निवडून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांनी पदभार घेऊन महिना उलटला नाही तोच नगराध्यक्षांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी नगरपालिकेतील आस्थापना विभागातील कर्मचारी अक्षय धारक यांना पीटीआर द्यायला पैसे का मागितलेस म्हणून नगरपालिकेत येत अक्षय धारक यांना खाली बोलावून त्यांच्या श्रीमुखात भडाकावली त्यानंतर त्यांच्या साथीदाराने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची खळबळ घटना घडली. दरम्यान हा प्रकार चालू असताना येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी हे भांडण सोडवले व पुढे होणारा अनर्थ टाळला. याप्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष पतीची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. पुन्हा असा प्रकार झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

नियमानुसार काम करत होतो
माझ्याकडे आस्थापना विभाग असून पीटीआर विभागातील माणूस सुट्टीवर असल्यामुळे मला त्या ठिकाणी बसवण्यात आले होते. मी संबंधितांना पीटीआर दिली व नियमानुसार शंभर रुपयाची पावती फाडण्यास सांगितले. म्हणून बिलाल चाऊस व त्याच्या साथीदारांनी मला नगरपालिकेत येऊन मला मारहाण केली.
अक्षय धारक , कर्मचारी न.प. माजलगाव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles