Sunday, February 1, 2026

सायगावात मध्यरात्री गोळीबार; दोन पिस्तूल तीन जिवंत काडतुसासह आरोपी पकडला

अंबाजोगाई — तालुक्यातील सायगाव येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या रिवाल्वर बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला बर्दापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली. यावेळी पोलिसांनी दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे बुधवार दि.21 जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी वय 35 वर्ष याने बेकायदेशीररीत्या रिवाल्वर बाळगली,तसेच गोळीबार केला.घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी तात्काळ हालचाली करून आरोपीला ताब्यात घेतले.
पो.ह. गणेश विक्रम तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी व झाडाझडती दरम्यान आरोपीकडे एक विदेशी यु एस ए बनावटीची 9 एमएम पिस्टल, एक ‘जपान बनावटीची सिल्वर रंगाची रिवॉल्वर, तीन जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल क्र. MH 23 R 0317 असा एकूण एक लाख 33 हजाराचा मुद्देमाल मिळून आला आहे.
बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम 110 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सध्या गावात शांतता असून, आरोपीकडे ही शस्त्रे कोठून आली याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत.या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles