Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांनी गावगुंडांच्या माध्यमातून तसेच राजकारणी दलाल भडव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शोषणाला सुरुवात केली आहे. त्यातच आता चौसाळा परिसरातील हिंगणी बुजुर्ग येथील पवनचक्की कंपन्या एकत्रित जोडण्यासाठी दुष्काळी परिस्थिती असताना पिकांची नासाडी करून गावगुंडांच्या माध्यमातून धिंगाणा घालणं सुरू केला आहे. हाता तोंडाशी आलेला पसा कुडता कंपन्या नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. हा सगळा कारभार चौसाळ्यातून पठाण नावाचा अधिकारी करत असल्याची माहिती मिळत आहे.
हिंगणी बुद्रुक शिवारात पवनचक्क्यांची उभारणी केली आहे. दोन पवनचक्क्यांची एकत्रित जोडणी करण्यासाठी सध्या पोल उभारणी करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. शेतात उभारले जाणारे पोल त्यामुळे होणार पिकांचं नुकसान तसेच तारा ओढ ताना तारेखालील येणाऱ्या पिकांचे नुकसान झाले तरी आपलीच बद्री भरायची एवढा एक कलमी कार्यक्रम कंपन्यांच्या गुंडांनी सुरू केला आहे
जे शेतकरी पोल उभारणीसाठी संमती देत नाहीत त्यांना दबावात घेण्यासाठी काही दलाल राजकारणी कंबर कसून दबाव तंत्र वापरत आहेत. शेतकऱ्याचं घर जळालं तरी आम्ही जनहिताचे असल्याचा आवडणारे महाभाग चौसाळा परिसरात कमी नाहीत यांनीच पाळलेले गुंड शेतकऱ्यांना धमकावण्याचं काम देखील करत आहेत.
सध्या मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत आहे. सरकारची मदत आतापर्यंत कुठलीच भेटली नाही. थोड्याफार पावसावर जिवंत असलेली तूर तसेच रब्बीमध्ये पेरलेला गहू ज्वारी हरभरा पीक उध्वस्त करायचं व शेतकऱ्यांचा सरण कसं रचायचं याचच उदाहरण हिंगणी बुद्रुक शिवारात पाहायला मिळू लागला आहे. पीक निघण्याची वाट पाहण्याची सवड कंपन्यांना नाही. दलालांना तर नाहीच नाही. पोलची उभारणी करत असताना उभ्या पिकामध्ये तारा लोखंडी पोल टाकण्यात आले आहेत. याचीच उभारणी करताना आता उभी पिकं तुडवून नासधूस करायची एवढा एकच फंडा कंपन्यांच्या गुंडांनी सुरू केला आहे. पीक जमिनीत ओलावा नसल्यामुळे ती करपून जायची उभी उसाची पिकं कारखान्याला जायची याची वाट न पाहता कवडीमोलाचा भाव ज्याच्या शेतात पोल उभा राहणार आहे त्याला देणार असल्याचा गुळ शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. तर ज्याच्या शेतातून या तारा जाणार आहेत त्यांना तर पीक नष्ट केलं तरी हातात धतुराच दिला जाणार आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी दखल घ्यावी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.