दिवसभर अपघातांची मालिका, महामार्ग पोलिसांवर ताण; रात्री पाडळशिंगीत दोन कर्मचाऱ्यांना कारची धडक!

Spread the love

महामार्ग पोलिसांच्या जीवाला धोका या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

बीड — धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता जीव धोक्यात घालून काम करण्याची वेळ आली आहे.

शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रात्री पाडळशिंगी टोलनाक्यावर कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना इंडिका विस्टा (एमएच २३ एडी ००१२) कारने जोरदार धडक दिली. या घटनेत बाळकृष्ण म्हेत्रे आणि सचिन पवळ हे दोघे जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. धडकेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.

महामार्ग पोलिसांच्या जीवाला धोका – नेमकं काय घडलं?

शनिवारी दुपारी कोळवाडी फाट्याजवळ चार अपघातांच्या घटना घडल्या होत्या. या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या घटनांमुळे महामार्गावरील घाटातील वाहतूक सुरळीत करून सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी धावपळ करावी लागली. अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, अशा जबाबदाऱ्या महामार्ग पोलिसांना पार पाडाव्या लागत होत्या.

महामार्ग पोलिसांच्या जीवाला धोका पाडळशिंगी टोलनाका अपघात बीड

याच पार्श्वभूमीवर रात्री पाडळशिंगी टोलनाक्याजवळ पोलीस कर्मचारी बाळकृष्ण म्हेत्रे आणि सचिन पवळ हे कर्तव्य बजावत होते. यावेळी इंडिका विस्टा ही कार येताना दिसल्याने त्यांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कार न थांबवता दोन्ही कर्मचाऱ्यांना धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्ग पोलिसांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे.

या धडकेत दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दिवसभर अपघातांच्या घटनांमुळे महामार्गावरील परिस्थिती हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रात्री अशा प्रकारे अपघाताचा सामना करावा लागल्याने महामार्ग पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर यांची भेट

घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक डॉ. रुपाली दरेकर यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुंडे, पोलीस उपनिरीक्षक बबन राठोड, संघर्ष गोरे यांच्यासह महामार्ग पोलीस पथकातील इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच घटनास्थळालाही भेट दिली.

पोलिसांचाच जीव सुरक्षित नाही, मग सामान्य प्रवाशांचे काय?

महामार्गावर अपघातांचे प्रमाण, वाहनांचा वेग आणि अपघातानंतरची परिस्थिती हाताळताना पोलिसांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. पाडळशिंगी टोलनाक्यावरील घटनेने हा धोका पुन्हा अधोरेखित केला आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच भरधाव वाहनांची धडक बसत असेल, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महामार्गावरील अपघातांच्या वेळी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेणाऱ्या पोलिसांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग, कमी दृश्यमानता आणि वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन यामुळे धोका अधिक वाढतो. बीड जिल्ह्यातील इतर महामार्ग अपघाताच्या बातम्या येथे वाचा. नागरिकांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांचाच जीव सुरक्षित नसेल, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, महामार्ग पोलिसांच्या जीवाला धोका रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *