महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीसह भारतातील 5 राज्यात निवडणुका जाहीर

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची तारीख आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केली.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यात निवडणुका होणार आहेत. तर, महाराष्ट्रात पोटनिवडणूक होणार आहे. 5 राज्यामध्ये भारतातील पावरफुल नेत्यांची सत्ता आहे.

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूमध्येही २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय, 9 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी आठ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा जागांची आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सध्या सत्तेत आहे.आसाम विधानसभेत 126 जागा आहेत. सध्याचे सरकार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे युती आहे, ज्याचे नेतृत्व हिमंता बिस्वा शर्मा करत आहेत.तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) हा सत्ताधारी पक्ष आहे.केरळमध्ये 140 जगांसाठी निवडणूका होत आहेत. येथे सरकार पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीकडे आहे.पुद्दुचेरी विधानसभेत 30 जागा आहेत. येथील सध्याचे सरकार एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि भाजपचे युती आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles