ज्ञानेश कुमार यांच्या मदतीशिवाय मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नसते’; इंडिया आघाडीच्या रॅलीत राहुल गांधींचा गंभीर आरोप

Spread the love

Rahul Gandhi matchori aarop – रामलीला मैदानातून मोदी सरकारवर थेट हल्ला. राहुल गांधींनी CEC ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करत हा मतचोरीचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीच्या वतीने भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करत, त्यांच्या मदतीशिवाय नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नसते, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे नेते, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. या माध्यमातून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला.

rahul gandhi matchori aarop

संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही!

रामलीला मैदानावरील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला थेट आव्हान दिले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचवायचा संदेश दिल्लीतील जनसागराने दिला आहे. हा केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा आवाज नसून देशातील तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे.

देशातील लोकशाही कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. तुमच्याकडे प्रचंड पैसा असू शकतो, तुम्ही स्वतःला शक्तिशाली समजत असाल; मात्र संविधानापेक्षा मोठे कोणीही नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi matchori aarop:मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी

निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाची व्यवस्था पुन्हा योग्य मार्गावर आणायची असेल, तर सर्वप्रथम मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Rahul Gandhi matchori aarop करून प्रकरणात जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अमित शाह म्हणतात की नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत; मात्र जनता त्यांना सत्तेत राहू देणार नाही, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.

तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेला एकजुटीचे आवाहन

या आंदोलनात विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विरोधी पक्षनेत्यांनी केले होते. केवळ राजकीय पक्षांपुरते हे आंदोलन मर्यादित नसून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी व्यापक जनचळवळ उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

दरम्यान, सणासुदीच्या काळात स्थानिक विक्रेते आणि छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांच्याकडूनच खरेदी करण्याचे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.

रामलीला मैदानावरील या रॅलीच्या माध्यमातून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधातील आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. विशेषतःRahul Gandhi matchori aarop तसेचमतदार यादी, निवडणूक प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे या सभेतून दिसून आली.

महामार्ग पोलीस अपघात बातमी वाचा: सह्याद्री माझावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *